भुसावळ तालुक्यात साकरी फाट्याजवळ घटना
भुसावळ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील साकरी फाट्याजवजळ दुचाकी घसरल्याने गंभीर जखमी झालेला भाजीपाला विक्रेता दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मंगळवारी ३ मे रोजी सकाळी ९ वाजता मृत्यू झाला आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सुनिल आनंदा भारंबे (वय ५५ रा. विठ्ठल मंदीर, साकरी ता.भुसावळ) असे मयत भाजीपाला विक्रेत्याचे नाव आहे. सुनिल भारंबे हे भाजीपाला विक्री करून ते आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करत होते. रविवारी १ जून रोजी रात्री ८.३० वाजता ते भाजीपाला विक्री करून दिपनगर येथून घरी जाण्यासाठी दुचाकीने निघाले. साकरी फाट्याजवळ असल्यानंतर त्यांची दुचाकी अचानक घसरली. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्यांना तातडीने भुसावळातील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सरू असतांना मंगळवारी ३ जून रोजी सकाळी ९ वाजता मृत्यू झाला. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार युनूस मुसा शेख हे करीत आहे.