जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील शिरसोली येथील एका तरुणाने त्याच्या जुन्या राहत्या घरी छताला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवार दि. ६ जून रोजी संध्याकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.
डिगंबर अरुण खलसे (वय २३, बापू नगर, शिरसोली प्र.बो.) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याने बापू नगरात नवीन घर घेतले आहे तर जुने घर शिरसोली प्र.बो.अस्वार वाड्यात आहे. आज दुपारी गावातच डिगंबर हा लग्न ठिकाणी जेवणासाठी गेला होता.तेथुन तो त्याच्या जुन्या घरी अस्वार वाड्यात गेला.
तिथे त्यांने कुठल्यातरी नैराश्यातून दरवाजा बंद करून आत मध्ये छताच्या कडीला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी ४:३० वाजेच्या सुमारास त्याची आई त्याला पाहण्यासाठी जुन्या घरी आली तेव्हा दरवाजा आतुन बंद होता.यावेळी आईने आवाज दिला पण दरवाजा डिगंबर उघडत नसल्याने आईने आरडाओरडा केला तेव्हा नागरिकांनी दरवाजा तोडून आत बघितले तर डिगंबर हा छताला दोरी बाधून गळफास घेऊन आढळला.
तात्काळ त्याला जळगाव शासकीय रुग्णालयात नागरिकांनी आणले. तिथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चंदन महाजन यांनी त्याला मयत घोषित केले. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते. डिगंबर खलसे यांने आत्महत्या का केली हे मात्र कळू शकले नाही, सदर याबाबतीत पोलीस चौकशी करीत आहे . डिगंबर यांच्या पश्चात एक लहान भाऊ ,दोन विवाहित बहिणी, व आई-वडील असा परिवार आहे.