मुक्ताईनगर पोलिस स्टेशनची कारवाई
मुक्ताईनगर ( प्रतिनिधी ) – दुतोंडी साप, मांडूळ, कासव व अन्य वन्य प्राण्यांसह बनावट नोटांचे व्हिडिओ प्रसार माध्यमांवर व्हायरल करून परराज्यातील नागरिकांना मुक्ताईनगर तालुक्यातील जंगलात बोलवत लुटण्याच्या तयारीत असणाऱ्या सहा संशयितांना मुक्ताईनगर पोलिसांनी जेरबंद केले. ही कारवाई २४ सप्टेंबरला रात्री दहा ते साडेबारा वाजेच्या सुमारास झाली.

मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णांड तपासणी नाक्याजवळ वाहतूक पोलिस वाहनांची तपासणी करत होते. त्या वेळी ही कारवाई झाली. संशयितांनी परराज्यातील काहींना मुक्ताईनगर तालुक्यातील जंगलामध्ये बोलावले होते. या प्रकरणी पोलिसांनी पवन दिनेश गौर (रा. आडगाव खुर्द, ता. हरदा, जि. हरदा), अरविंद कुमार काशीराम राठोड (रा. हरदा, जि. हरदा), राजेश शंकरलाल साहू (रा. शहापूर जि. बऱ्हाणपूर), चेतन सुरेश श्रीवास्तव (रा. लालबाग, बहऱ्हाणपूर), गोपाल श्रीराम यादव (रा. शिवनी माधवा ता. नर्मदापूर, मध्य प्रदेश), चेतन गोविंद यादव (रा. न्यू कॉलनी बऱ्हाणपूर) यांना अटक केली.









