बुलडाणा ( प्रतिनिधी ) – सरकारने ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना तात्काळ विना अट 50 हजाराची मदत करावी. पैसे नसतील तर आमदार, खासदार आणि मंत्र्यांचे पगार एक वर्षासाठी थांबून शेतकऱ्यांना मदत करा, अशी मागमी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी केली आहे.

अतिवृष्टीमुळे बुलडाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रामधील सोयाबीन, कपाशी, तूर, उडदाचे, मुगाचे पीक वाहून गेलेले आहे. शेतकरी पूर्ण अडचणीत आहे. आता चार-पाच वर्षे जमीन नीट होणार नाही, अशी परिस्थिती आहे. खोलीकरण नसल्यामुळे पाणी सगळ्या शेतांमध्ये आहे. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना तात्काळ विना अट 50 हजाराची मदत करा , पैसे नसतील तर आमदार, खासदार – मंत्र्यांचे पगार एक वर्षासाठी थांबून शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन शेतकरी संघटनेना आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केलीये.
मागील 3 दिवसांपासून राज्यात कोसळणाऱ्या पावसामुळे झालेल्या शेतीचे नुकसान पाहता शेतकरी पूर्णपणे हवालदिल आहे. तुपकरांनी नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला.







