जळगाव ( प्रतिनिधी ) – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचे पाळधीत शिवसेनेकडून जोरदार स्वागत करण्यात आले.
पाणीपुरवठा व स्वछता मंत्री ना. गुलाबराव पाटील सध्या सिल्वाहासा येथे प्रचार दौऱ्यानिमित्त असल्यामुळे आमदार रोहित पवार यांचे स्वागत जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले.
पाणीपुरवठा व स्वछता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे स्नेह व मार्गदर्शन नेहमीच लाभत राहते असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. मंत्रीमहोदयांनी जळगावला आल्यावर घरी येण्याचे निमंत्रण दिलेले होते. यानिमित्ताने आमदार रोहित पवार यांनी पाळधी येथे भेट दिली व गुलाबराव पाटील इंग्लिश मिडीयम स्कुल येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
याप्रसंगी विक्रम पाटील, मुख्याध्यापक डी डी कंखरे , इंग्लिश मीडियम स्कूलचे सचिन पाटील , कनिष्ठ महाविद्यालयाचे योगेश करंदीकर , ,माजी सभापती मुकुंद नन्नवरे , पाळधीचे सरपंच प्रकाश पाटील, माजी सरपंच अरुण पाटील, विजू बापू पाटील, चंदन कळमकर, अनिल पंडित, प्रशांत झवर, अनिल माळी, समाधान वाघ, मच्छिंद्र साळुंखे, चंदू पवार, रवींद्र मानकरी, किशोर पाटील, डॉ व्ही डी पाटील, चंदू पवार , योगेश सोनवणे, सोनू माळी, सोनू फुलपगारे, जिपीएस स्कुलचे सर्व कर्मचारी व शिवसैनिक उपस्थित होते.