मुंबई ( प्रतिनिधी ) – आमदार मंगेश चव्हाण यांनी आज चाळीसगाव तालुक्यातील पुरग्रस्तांचा प्रश्न विधानसभेत मांडला .
५ महापुरांचा फटका सहन करणाऱ्या चाळीसगांव तालुक्यातील पूरग्रस्तांचा आवाज आमदार मंगेश चव्हाण यांनी मांडला हजारो गुरे वाहून गेली, शेकडो घरे उजाडली मात्र चाळीसगांव पूरग्रस्तांना अजून एक रुपयाची मदत मिळाली नाही, आमच्या तालुक्याला तात्काळ कोकणच्या धर्तीवर मदत करा . शेती , गुरे आणि घरांच्या हानीचा एकत्रित विचार करून कशी मदत करणार आहात ते सरकारने स्पष्ट करावे अशी मागणी त्यांनी विधानसभेत केली. त्यावर कोकण – पश्चिम महाराष्ट्राच्या निकषाप्रमाणे चाळीसगाव तालुक्यातील पूरग्रस्तांना मदत देण्याचे आश्वासन त्यांच्या या प्रश्नावर मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले .