भडगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील आमडदे येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेतून ३ कोटी १७ लाख ७९ हजार ८५० रुपये किमतीच्या दागिन्यांसह कुलूप आणि सीसीटीव्ही डीव्हीआरसह ३ कोटी १७ लाख ९० हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या ३ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरलेला मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
पो नि अशोक उतेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आमडदे येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेचे व्यवस्थापक तन्मय देशपांडे ( रा – जळगाव ) यांनी ही फिर्याद दाखल केली होती . राहुल अशोक पाटील ( वय २४ ) , विजय नामदेव पाटील ( वय ३९ ) , विकास तुकाराम पाटील ( वय ३७ , तिघेही रा – आमडदे ) अशी या आरोपींची नावे आहेत .
स पो नि चंद्रसेन पालकर , पो उ नि दत्तात्रय नलावडे , सहाय्यक फौजदार कैलास गीते , पो हे कॉ विलास पाटील , नितीन रावते , किरण पाटील , ज्ञानेश्वर महाजन , स्वप्नील चव्हाण , स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार अशोक महाजन , विजयसिंग पाटील , पो हे कॉ लक्ष्मण पाटील , पो ना राहुल पाटील , रणजित जाधव , प्रीतम पाटील , किशोर राठोड , विनोद पाटील , ईश्वर पाटील , उमेश गोसावी , श्रीकृष्ण देशमुख यांच्या पथकाने युद्धपातळीवर प्रयत्न करून हे आरोपी पकडून मुद्देमाल जप्त केला.