भडगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यात ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीला आली. आरोपीला अटक करण्यात आली असून भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भडगाव तालुक्यात ११ वर्षीय मुलगी कुटुंबियांसह राहते. गावातील प्रभाकर कौतीक माळी या तरूणाने १२ ऑक्टोबररोजी दुपारी त्यांच्या घरात कुणीही नसतांना पिडीत मुलीला बोलावून घेतले. तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार पिडीत मुलीने कुटुंबियाना सांगितला. पिडीत मुलीच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपी प्रभाकर कौतीक माळी याला भडगाव पोलीसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोउनि दत्तात्रय नलवाडे करीत आहेत.