जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पेन्शन धारकांचे ९ ऑगस्ट रोजी धरणे आन्दोलन
जळगाव ( प्रतिनिधी ) – अखिल भारतीय राष्ट्रीय संघर्ष समिती (ई पी एस ९५) जळगांव यांच्या वतीने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व (ई पी एस ९५) पेन्शन धारकांचा आक्रोश पंधरवडा तसेच दि. ४ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय संघर्ष समितीचे अध्यक्ष माननीय कमांडर अशोक राऊत साहेब व त्यांच्या समावेत वृध्द पेन्शन धारक व महिला भगिनी यांना धक्का बुक्कि व अमानवीय वर्तवणूक केल्या मूळे सर्व देशभरातील (ई पी एस ९५) पेन्शन धारक संतप्त झाले असून यांचा तीव्र निषेध म्हणून ९ ऑगस्ट क्रांती दिनी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
दि. ४ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय संघर्ष समितीचे अध्यक्ष माननीय कमांडर अशोक राऊत साहेब व त्यांच्या समावेत वृध्द पेन्शन धारक व महिला भगिनी यांना धक्का बुक्कि व अमानवीय वर्तवणूक केल्या मूळे तसेच पेन्शनधारकांच्या विविध मागण्याकडे सरकार लक्ष देत नसल्याने सर्व देशभरातील (ई पी एस ९५) पेन्शन धारक संतप्त झाले असून यांचा तीव्र निषेध म्हणून ९ ऑगस्ट क्रांती दिनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत असून तरी आपण सर्वांनी घऱी बसून न राहता उपस्थित राहून आपली एकजूट दाखवून द्यावी .या दिवशी पेन्शन वाढीचा प्रश्न शेवटच्या टप्प्यात आलेला असून त्याबद्दल सविस्तर माहिती या दिवशी आंदोलन स्थळी देण्यात येईल. संघटनेचे जळगांव जिल्हा अध्यक्ष अरविंद भारंबे,उपाध्यक्ष श्री. रमेश नेमाडे,महाराष्ट्र उपसचिव हरी व्यवहारे जामनेर यांच्या नेतृत्वात हे एक दिवसीय धरणे आंदोलन व उपोषण करण्यात येणार आहे. तरी जळगांव जिल्हा व तालुका पेन्शन धारकांनी तसेच महिला भगिनी यांनी उपस्थित राहावे व सह भाग नोंदवावा. यावेळी संजीव बी खडसे कार्याध्यक्ष जळगांव जिल्हा, सचिव डी एन पाटिल,प्रसिध्दी प्रमुख कौतिक किरंगे, समन्वयक अनिल तात्या पवार पाचोरा, एम एम सरोदे भुसावळ ता अध्यक्ष,पी एस पाटिल – दिलिप किरंगे, अनिल जावळे भुसावळ, सुरेश महाजन फैजपूर, डी बी वानखेडे – सपकाळे,संतोष पाटिल खजिनदार जामनेर बोदडे अण्णा पाचोरा, तसेच सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी तसेच सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित राहणार आहे.