“तृतीयपंथी समुदायाचे मराठी साहित्यातील चित्रण आणि स्थान” वर सादरीकरण
जळगाव (प्रतिनिधी) :- भारत निवडणूक आयोगाच्या अधीनस्थ कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे यंदाच्या अमळनेर येथील १७च्या अखिल भारतीय मराठी साहित्य समेलनात तृतीयपंथी समुदायाचे मराठी साहित्यातील चित्रण आणि स्थान या विषयावरील परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. या प्रकारे सलग चौथ्या वर्षी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय संमेलनात सहभागी होत आहे. याबाबतची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी बुधवारी दि. ३१ रोजी पत्रपरिषदेत दिली.
निवडणुकांमुळे लोकशाहीचा ढाचा अबाधित राहतो, पण लोकशाही शासनव्यवस्था समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचून ती स्त्रहीत होणेही तितकेच महत्त्वाचे असते. या अनुषंगाने मराठी साहित्यात तृतीयपंथी समुदायाचे चित्रण आले आहे का, ते कशा प्रकारे केले गेले आहे, ते करताना लोकशाही, साविधानिक मूल्याचे प्रतिबिंब उमटले आहे का, त्याच्यापर्यंत लोकशाही पोहोचली आहे का, ती पोहोचण्यासाठी काय करता येईल अशा विविध प्रश्नांची चर्चा या परिसंवादात केली जाणार आहे.
या परिसंवादात ‘एलजीबीटीआयक्यूं” समुदायाचे अभ्यासक आणि बिंदू क्वीअर राइट्स फाऊडेशनचे अध्यक्ष बिंदुमाधव खिरे, तृतीयपंथी म्हणजेच पारलिंगी समुदायातील सामाजिक कार्यकर्त्या शमीभा पाटील, विजया बसावे, पूनीत्त गौडा, डैनियल्ला मॅक्डोन्ना आणि महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे हे मान्यवर सहभागी होणार आहेत. मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार परिसंवादाचे संवादक आहेत. संमेलनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे २ फेब्रुवारी रोजी सायकाळी ४.३० वाजता, कविवर्य ना. धों. महानोर सभागृहात आयोजित सदर परिसंवादाचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावरून आणि फेसबुक, ट्विटर, यूट्युब, इन्स्टा या समाजमाध्यमांवरुनही थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
या संमेलनात मतदार जागृतीसंबंधी प्रकाशने, मतदार नोंदणी केंद्र, भारतीय निवडणुकांच्या प्रवासाचे प्रदर्शन, शालेय- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मतदार जागृती खेळ आणि मीम्स अशी दालनेही असणार आहेत. त्यामध्ये डिजिटल स्क्रीनवरही मतदार जागृतीचे साहित्य दाखवले जाणार आहे. फिरत्या वाहनांमधून ईव्हीएमविषयी जागृती करण्यात येणार आहे. तसेच, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाद्वारा प्रकाशित आणि डॉ. दीपक पवार संपादित ‘आम्हीही भारताचे लोक’, ‘लोकशाही समजून घेताना’ आणि ‘कशासाठी? लिगभाव समतेसाठी ही पुस्तके सवलत दरात उपलब्ध असतील. सर्वसामान्य नागरिकांबरोबरीने विद्यार्थी व शिक्षक यांनी मोठ्या संख्येने या दालनांना भेट देऊन लोकशाहीसंबंधीचे लुडो, सापशिडी यांसारखे खेळ तसेच व्यासपीठे समजून घ्यावीत, तसेच नव्याने पात्र तरुणांनी मतदार नोंदणी करावी, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.