पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथे अखंड हरिनाम सप्ताहाला ६ सप्टेंबरपासून प्रारंभ झाला आहे.

विधीवत पूजा करण्याचा सन्मान गावातील महादेव मंदिर संस्थानचे विश्वस्त ह. भ. प. उत्तम गोकुळ बाविस्कर यांना देण्यात आला या सप्ताहात दररोज रात्री ८ वाजता संकीर्तन होणार आहे. या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता १३ सप्टेंबररोजी होणार आहे. त्या दिवशी सकाळी ५ वाजता काकड आरती व ९ वाजता काल्याचे कीर्तन होणार आहे. सात दिवसाचा पूजा विधी सोहळा गुरुवर्य दिनकर खुरे यांच्या मार्गदर्शनाने होणार आहे.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी महादेव मंदिरा संस्थान कमिटी अध्यक्ष सुभाष पाटील, सचिव बापु सूर्यवंशीसह सर्व सभासद, महादेव भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ, शिवतेज भजनी मंडळ, ग्रामस्थ व तरुण परिश्रम घेत आहेत.







