एरंडोल शहरातील घटना ; माहेरची मंडळी रुग्णालयात संतप्त
एरंडोल (प्रतिनिधी) :- येथे एका विवाहित महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. ४ जून रोजी बुधवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून संध्याकाळी माहेरच्या मंडळींच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
मनीषा सागर सोनार (वय ३५, जेडीसीसी बँकेच्या मागे, एरंडोल) असे मयत महिलेचे नाव आहे. मनीषा ही पती सागर सोबत पुणे येथे वास्तव्यास होती. गेल्या वर्षभरापासून मनीषा ही पती व ९ वर्षीय मुलासह एरंडोल येथे राहत होती.(केसीएन)दरम्यान बुधवारी दि. ४ जून रोजी रात्री मनीषा ही परिवारासोबत जेवण करून वरच्या मजल्यावर गेली. बराच वेळ झाला तरी मनीषा ही खाली न आल्याने मनीषाचा मुलगा आईला बघायला वर गेला असता, मनीषा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली.
त्याच्या आवाजावरून कुटुंबीय व शेजाऱ्यांनी पोलिसांना घटनेची माहिती कळवली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.(केसीएन)दरम्यान, मनीषा सोनार हिने आत्महत्या का केली याबाबत स्पष्टता झालेली नाही. एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संध्याकाळी माहेरच्या मंडळींच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. तपास निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.
०००००००००००००००