रावेर ( प्रतिनिधी ) – अहीरावाडी येथून मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दोन म्हशी लांबविल्याची घटना उघडकीला आली वारंवार होत असलेल्या गुरांच्या चोऱ्यांमुळे शेतकरी हैराण झाले आहे. या चोरीची अद्याप पोलीसात नोंद करण्यात आलेली नाही.
रावेर तालुक्यातील आहीरवाडी येथील शेतकरी तुळशीराम धनगर यांच्या मालकीच्या दोन म्हशी गोठ्यात ७ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता बांधलेल्या होत्या. मध्यरात्री रात्री अज्ञात चोरट्यांनी गोठ्यातून १ लाख ७५ हजार रूपये किंमतीच्या दोन म्हशी चोरुन नेल्या चोरीची माहिती मिळताच भाजपा पदाधिकारी संदीप सावळे यांनी घटनास्थळी भेट दिली अद्याप पोलीसात नोंद करण्यात आलेली नाही.