रावेर शहरातील घटना
रावेर (प्रतिनिधी) :- येथील व्यापारी कन्हैय्यालाल अग्रवाल यांनी काहीतरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री घडली. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
येथील व्यापारी संघाचे अध्यक्ष कन्हैय्यालाल पुनमचंद अग्रवाल (वय ७०) यांनी रविवारी रात्री काहीतरी विषारी औषध प्राशन केले होते. त्यांना येथील खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारारार्थ जळगाव येथे नेत असतांना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. याबाबत आयुष अग्रवाल यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेका विष्णू भिल करीत आहेत. सामजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात विविध अग्रवाल यांनी विविध पदे भुषवलेली आहे.