जामनेर तालुक्यात पहूर रस्त्यावर घडली घटना
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील जामनेर ते पहूर मार्गावर धावत्या खाजगी ट्रॅव्हल्स बसला अचानक आग लागल्याची घटना आज दि. २७ मे रोजी घडल्याने खळबळ उडाली होती. बसमधील प्रवासी वेळीच खाली उतरले. त्यानंतर बस खाक झाली आहे.
पुण्यातून मध्यप्रदेशकडे जात असलेल्या मध्यप्रदेशातील एक खासगी ट्रॅव्हलची बस जामनेर पहूर रस्त्यावरून जात असताना त्यातून धूर निघत असल्याचे लक्षात येताच चालकाने समय सुचकता दाखवत गाडी जागीच थांबवली. काही वेळातच बसला लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले. मात्र बसमध्ये असलेले प्रवासी वेळीच उतरल्याने मोठा अनर्थ चढला आहे. शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आग विझवली. पोलीस स्टेशनला कुठलीच नोंद नव्हती.