जळगाव (प्रतिनिधी ) ;-
तालुक्यातील मोहाडी येथील ३५ वर्षीय महिलेने स्वतःला राहत्या घरात डिझेल अंगावर ओतून जाळून घेतल्याची घटना आज दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास घडली असून तिचा उपचारासाठी नेत असतांना रस्त्यातच मृत्यू झाला. तिला मयतावस्थेत जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय येथे आणले असता तिला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. रेखा रमेश राठोड (वय ३५ ) असे मृत महिलेचे नाव आहे. मयताच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात एकच आक्रोश केला असून मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. .यावेळी आई विमल चव्हाण आणि वडील धनराज चव्हाण यांनी तिला सासरच्या मंडळींनी जाळल्याचा आरोप केला. दरम्यान मयत रेखा राठोड हिचा पती रमेश हा पॅजो रिक्षाचालक असून पश्चात पती, मुलगा प्रशांत राठोड , मुलगी विद्या राठोड असा परिवार आहे.
बापाशी सकाळी बोलली अन अचानक असे कसे घडले असा आरोप मयत महिलेचे वडील धनराज चव्हाण यांनी केला. नवरा मी तिला वागविणार नाही असे सांगत होता मग तिला आमच्याकडे का पाठविले नाही . नाहीतर ती जळली नसती असेही धनराज चव्हाण यांनी सांगितले. सासरच्या मंडळींनी तिला मारले असल्याचा आरोप यावेळी केला.
दोन्ही कुटुंबियांमध्ये समझोता
जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे यांनी जिल्हा रुग्णालयात येऊन मयताच्या मुलांना आर्थिक मदत आणि त्यांच्या नावावर प्रॉपर्टी करण्याबाबत चर्चा केली. समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी हि बाब मान्य करून दोन्ही कुटुंबीयांमध्ये समझोता घडवून आणला. यानंतर एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह नेला. तसेच मयतावर रात्री अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे . याबाबत पोना सुनील सोनार , पोलीस कॉन्स्टेबल शांताराम पाटील प्राथमिक तपास करीत आहे.