पाचोरा ;- ग्रामीण रुग्णालय परिसर जवळ शासकीय १०८ या बंद रुग्णवाहिकेला अचानक टायर फुटल्याने आग लागल्याची घटना आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. या आगीमध्ये संपूर्ण रुग्णवाहिका हि जळून खाक झाली.
पाचोरा नगर पालिका अग्निशमनच्या कर्मचारी राजेश कंडारे, राजू भोसले, दीपक पाटील, फिरोज भाई, आदींनी आग विझवली. दरम्यान आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही.