जळगाव;- शिरसोली रोडवर असणार्या अनुभूती स्कूलच्या बाजूला डोंगराला रात्री उशीरा भीषण आग लागल्याने मोठी हानी झाली आहे .
शिरसोली ते मोहाडी रस्त्याच्या दरम्यान असणार्या एका डोंगराला रात्री आग लागली. पहिल्यांना मर्यादीत आकारात असणार्या या आगीने काही मिनिटांमध्येच भीषण स्वरूप धारण केले. डोंगराला आग लागल्याचे पाहून परिसरातील ग्रामस्थानी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. रात्री उशीरापर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते. या आगीत वनराई जळून खाक झाली .







