गांधीनगर ( वृत्तसंस्था ) – लक्ष्य के बिना पथमे पथिक विश्राम कैसा ! , या युक्तीची अक्षरशः प्रचिती यावी अशी चोरी अहमदाबाद शहरात झाली आहे खिडकीतून जाऊन चोरी शक्य व्हावी म्हणून चोराने ३ महिन्यात १० किलो वजन घटवले आणि ३७ लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला !
अहमदाबाद शहरात राहणारा 36 वर्षीय मोती सिंह चौहान हा मोहित मराडिया यांच्या घरी काम करत होता. घरातील सर्व मौल्यवान वस्तू कुठे ठेवल्या आहेत, याची त्याला चांगलीच माहिती होती. त्यामुळे त्याने मराडियांच्या घरात चोरी करण्याचे ठरवले. मोहित मराडिया यांनी घराला इलेक्ट्रॉनिक दरवाजांनी संरक्षित केले होते. जे तोडले जाऊ शकत नव्हते. म्हणून त्याने युक्ती लढवली जवळपास तीन महिने मोती सिंह चौहान याने दिवसातून फक्त एक वेळ जेवण केले. रात्रीचे जेवण त्याने टाळले. व्हेंटिलेशनमधून पार जाण्यासाठी 10 किलो वजन कमी करायचे होते, हे करुन बारीक होण्यात तो यशस्वी झाला आणि त्याने घरातील तब्बल 37 लाख रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला.
आपल्या तंत्राच्या सहाय्याने घरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना चकवा देण्यात यश मिळवले, परंतु स्थानिक हार्डवेअरच्या दुकानातून साहित्य खरेदी करतानाचे फुटेज सापडल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडले. त्यानंतरच चौहानने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी केलेला पर्दाफाश पाहून मराडिया कुटुंबही अवाक झाले. चौहानच्या फोन लोकेशननेही त्याची पोलखोल केली आणि पोलिसांना त्याला पकडण्यात मदत झाली.