चोपडा तालुक्यातील घटना, पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यावर तरुणाला कोठडी
चोपडा (प्रतिनिधी) :- येथील एका सरकारी आदिवासी वसतिगृहातील १७ वर्षीय विद्यार्थिनी हि लैंगीक अत्याचारातून गरोदर राहिल्याची घटना उघड झाली आहे. मैत्रिणीच्या रूमवर गेल्या दोन वर्षापासून तरुण तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत होता. पीडितचे पोट दुखत असल्याने ती शहरातील दवाखान्यात उपचारासाठी आल्यावर ती गरोदर असल्याचे कळाले. त्यानंतर पीडितेने लैंगिक अत्याचार झाल्याची फिर्याद चोपडा शहर पोलीस स्टेशनला दिली. तक्रारीनंतर पोलिसांनी संशयित आरोपीस रात्रीच ताब्यात घेऊन अटक केली.
दरम्यान संशयितास बुधवारी अमळनेर येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे. शिरपूर तालुक्यातील एका गावातील १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनी चोपडा येथे सरकारी आदिवासी वसतिगृहात इयत्ता १२ वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. तिच्यावर अविनाश वेस्ता पावरा (वय-२२) याने जानेवारी २०२३ मध्ये शहरातील जुना शिरपूर रोडवरील एका हॉस्पिटलच्या मागे असलेल्या पीडितेच्या मैत्रिणीच्या रुमवर चार वेळेस लैंगिक अत्याचार केला. तसेच दि.२६ जून २०२५ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शिरपूर रोडवरील हरेश्वर मंदिराच्या पाठीमागे झाडाझुडपांमध्ये पीडित विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. अल्पवयीन पीडितेच्या फिर्यादीवरून अविनाश वेस्ता पावरा (वय २२, रा. अंमलवाडी पोस्ट उमर्टी ता. चोपडा) याचे विरुद्ध शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित तरुणास अटक करण्यात आली आहे. तपास पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी करीत आहेत.