जळगांव(प्रतिनिधी) – ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन, नागपूरची सन १९६७ मध्ये स्थापना करण्यात आली असून केंद्रीय सरचिटणीस अध्यक्ष प्रा. मधुकर उईके यांच्या संमतीने केंद्रीय सरचिटणीस विजय कोकडे व केंद्रीय सहकार्याध्यक्ष देवा पवार यांच्या स्वाक्षरीने दि. ११ ऑक्टोबर रोजी जळगाव जिल्हा कार्यकारणीस मान्यता देण्यात आलेली आहे.
ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन घटनेप्रमाणे केंद्र व राज्य शासनाच्या नियंत्रणात असलेले सर्व विभागातील आदिवासी अधिकारी – कर्मचारी यांचे प्रशासकीय कामकाजासंबंधी अडीअडचणी सोडविणे व आदिवासींच्या विविध प्रश्नाबाबत जागृती करणे हे उद्दिष्ट आहे.
कार्यकारणीत रवींद्र बारेला-अध्यक्ष, प्रा. जयश्री साळुंखे- महिला उपाध्यक्ष ,सलीम तडवी- उपाध्यक्ष, सुनील गायकवाड- कार्याध्यक्ष, प्रकाश वसावे- सचिव, प्रदीप बारेला-कोषाध्यक्ष, शकीला तडवी – सहकार्याध्यक्ष, सुनील दाभाडे-सहसचिव, प्रा.डॉ. अमर पवार, उकार भिलाला, नवाज तडवी-संघटक, शिला बारेला- महिला संघटक, रंजन तडवी- प्रसिद्धी प्रमुख, विजय चव्हाण-सहप्रसिद्धी प्रमुख, प्राचार्य डॉ. नाना गायकवाड, नासेर तडवी, गजमल पवार,प्रा.के.के. वाळवी, शोभाराम बारेला-सल्लागार यांची निवड करण्यात आली.
जळगाव जिल्हा कार्यकणीची रविवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी ऑनलाईन बैठक पार पडली. सादर बैठकीत विविध ठराव व आदिवासी कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करून भविष्यातील धोरणे निश्चित करण्यात आली.








