जळगाव ( प्रतिनिधी ) — आधी घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील जामिनावर मुक्त असलेल्या आरोपीवर थेट त्याच्या घरात जाऊन चार जणांच्या टोळीने अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना आज शहरातील कांचनगरात घडली.
कांचननगर परिसरात आकाश सपकाळे कुटुंबियांसह राहतो. आज सकाळी चार हल्लेखोर दुचाकीने आकाशच्या घरासमोर आले. आकाश घरात झोपलेला असतांना चारपैकी दोन जणांनी घरात घुसून आकाशवर गोळीबार केला आकाशच्या उजव्या हाताच्या करंगळीला जखम झाली. विकी उर्फ मयूर अलोने, सोनू सपकाळे, बापू सपकाळे व एक अज्ञात व्यक्ती या चार जणांनी हा हल्ला केल्याचे आकाश सपकाळे यांनी सांगिेतले. विकी अलोने याने गोळीबार केल्यानंतर आकाशचा भाऊ सागर याने विकी अलोनेला पकडले दोघांमध्ये झटापट झाली. या झटापटीत संशयित विकी दरवाजाच्या पायरीवरून खाली पडून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखपत झाल्याने तो बेशुध्द पडला. त्यांच्या हातातील गावठी पिस्तूल, मोबाईल, रूमाल आणि राऊंड खाली पडले.
आज झालेला गोळीबार हा पुर्ववैमनस्यातून झाल्याची माहिती समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वी एक खुनाचा गुन्हा घडला होता त्या राकेश सपकाळे हत्याकांडात आकाश सपकाळे आरोपी होता सध्या त्याची जामिनावर मुक्तता झाली असल्याने तो घरी होता प्रार्थमिक अंदाजानुसार या आधीच्या गुन्ह्यातील तणावातून आजचा गोळीबार घडला असावा असा पोलिसांचा कयास आहे असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.
आज गोळीबाराच्या वेळी झालेल्या झटापटीत हल्लेखोर एक तरूणदेखील जखमी झाला या गुन्ह्यातील तीन संशयित आरोपींना शनीपेठ पोलीसांनी अटक केली आहे अशी माहिती पोलीस अधिक्षक डॉ प्रविण मुंढे यांनी दिली.
जखमी आकाश सपकाळे आणि जखमी आरोपी विकी अलोने या दोघांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. विकी उर्फ मयूर अलोने, सोनू सपकाळे, बापू सपकाळे यांना शनीपेठ पोलीसांनी अटक केली आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ प्रविण मुंढे यांनी दिली.







