पारोळा (प्रतिनिधी) – नागरिक मंडळ तामसवाडी ता पारोळा संचलित आडगाव माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थीनी जयश्री अनिल बैसाणे ही इयत्ता १० वित ७०.२० टक्के गुण मिळवून १९-२० साली प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. तिला संस्थेचे संचालक व जिल्हा परिषद सदस्य रोहन पाटील यांच्या हस्ते तिला ५ हजारांचा धनादेश देण्यात आला.
इयत्ता १० वीत शाळेतून मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या मधुन प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांस सहायक आयुक्त समाज कल्याण विभाग जळगांव मार्फत प्रथम आलेल्या विदयार्थ्याना राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्काराचा समाज कल्याण विभागा कडून देण्यात आला.
यावेळी रोहन पाटील यांनी या विद्यार्थीनीचे कौतुक करीत वडील नसतांना आईने तिचे शिक्षण पुढे सुरू ठेवून आईचा विश्वास सार्थ ठरवीत शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान मिळविला. जयश्री ही सर्वांना आदर्श ठरावी असे यश तिने संपादन केले आहे.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक विलास पवार, बाळू पाटील, उपशिक्षक सचिन पाटील, विद्यार्थीनी आई संगीता बैसाने आदी जण उपस्थित होते.

छाया–आडगाव ता पारोळा येथील विद्यार्थीनीला चेक वाटप करतांना रोहन पाटील ,व्ही एस पवार ,सचिन पाटील आदी जण.







