जळगाव ( प्रतिनिधी ) – आदर्श नगरातून कापड व्यावसायिकाची घरासमोर लावलेली कार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहित प्रकाश कुकरेजा (वय-३०) हे दत्तकृपा अपार्टमेंटच्या मागे, आदर्श नगर येथे कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १९ ऑगस्टरोजी त्यांच्या घरासमोर त्यांनी त्यांची स्वीप्ट डिझायर कार (एमएच १९ सीएफ ४२२५) लावलेली होती. अज्ञात चोरट्यांनी त्यांची १ लाख २९ हजार रूपये किंमतीची कार चोरून नेली. गाडीत आर.सी.बुक, इन्सूरन्सचे कागदपत्र आणि कापडाचे नमुने देखील होते. संपूर्ण आदर्श नगर पिंजून काढल्यावरही त्यांना कार कुठेही मिळून आली नाही. २२ ऑगस्ट रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यांच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो ना विजय खैरे करीत आहेत.