मुलांना मार्गदर्शनाची गरज, ओरडण्याची नाही
मुलांना शिक्षणात प्रगती करण्यासाठी अभ्यासाविषयी गाेडी निर्माण करा. तुमची इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. इच्छाशक्ती, जिद्द, अथक प्रयत्न, अवधान किंवा मन एकाग्र करण्याची क्षमता व मनाची प्रसन्नता हे सर्व गुण एकत्र केल्यास परीक्षेमध्ये यश मिळविणे कठीण नाही.नकारात्मक विचार टाळा अभ्यासाचं ओझं वाटता कामा नये. ताे रडत-रखडत केला जाऊ नये. ताे मन लावून करावा. मनाची एकाग्रता, मन एकवटणे महत्त्वाचे असते. अभ्यास विषयावर लक्ष केंद्रित झाले पाहिजे. नकाे नकाे त्या विचारांची हकालपट्टी करा. त्रासदायक विचार येऊ देऊ नका, असे त्यांना सांगणे गरजेचे असते.
निर्धारपूर्वक मन स्वच्छ, माेकळे व प्रसन्न ठेवा. नकारात्मक विचारांना अजिबात थारा देऊ नका. अशा वातावरणात केलेला अभ्यास, केलेले वाचन हे अधिक चांगल्या प्रकारे मेंदूकडून ग्रहण केले जाते. अभ्यासाची गाेडी वाढवा वाचनाने व्यक्ती समृद्ध बनते. विचारांची श्रीमंती वाढते. नवनवीन विचार स्फुरतात. कल्पनाशक्ती तरल बनते. विचार प्रवाही बनतात.लिहिण्याचा तसेच बाेलण्याचा वेग वाढताे. स्मरण प्रक्रियेत प्रवाहीपणा येताे. आठवण्यासाठी प्रयत्न करावे लागत नाहीत.वारंवारच्या उजळणीमुळे त्यात एक ताजेपणा येताे. अर्थात हे सर्व घडून येण्यासाठी अभ्यास विषयांमध्ये रस असला पाहिजे.गाेडी असली पाहिजे. मन एकाग्रचित्त करून अभ्यास विषयामध्ये अभिरूची दाखविली तर स्मरण वाढते.