जैन हिल्सला राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा; बळीराजाचे पूजन
जळगाव ( प्रतिनिधी ) – ज्याप्रमाणे तंत्रज्ञान प्रगत होत आहे त्याप्रमाणेच मनुष्यालासुद्धा तंत्रज्ञानासोबत चालले पाहिजे. ड्रोन, एआयसह आधुनिक तंत्रज्ञान हे शेतीत येत आहे त्याचा चपखल वापर केला पाहिजे. आर्थिक दृष्ट्या परवडेल अशी अभियांत्रिकी शेती केली पाहिजे. त्यासाठी ड्रोन पायलट प्रशिक्षण वर्गावर भर दिला जात आहे, यातून ड्रोन फवारणीसह अन्य सेवांमध्ये रोजगार वाढेल. त्यासाठी विविध संस्था, औद्योगक क्षेत्र, शिक्षण क्षेत्र आणि सरकार यांच्या सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. कृत्रीम बुद्धीमत्तेचा वापर करुन निविष्ठामधील खर्च कसा कमी करता येईल, उत्कृष्ट रोपांची निर्मिती, यासाठी शेतीमधील आयटी तज्ज्ञ गावोगावी घडले पाहिजे यातून विकसीत भारत घडू शकतो असे मत डॉ. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी मिश्रा यांनी व्यक्त केले.


जैन हिल्स येथे सुरू असलेल्या ‘सायन्स टेकॅ@वर्क’ या हायटेक शेतीचा नवा हुंकार कृषीमहोत्सवात राष्ट्रीय कृषी दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी डॉ. इंद्रमणी मिश्रा यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी त्यांच्यासमवेत माजी डीडीजी हॉर्टिकल्चर डॉ. एन. के. कृष्णकुमार, नागपूरचे इंडियन सोसायटी ऑफ सिट्रसचे अध्यक्ष डॉ. दिलीप घोष, पंजाब अॅग्रीकल्चर युनिव्हसिर्टी लुधियानाचे शास्त्रज्ञ डॉ. संदीप सिंग, डॉ. एम. कृष्ण रेड्डी, इस्त्राईलचे शास्त्रज्ञ डॉ. अवी सडका, डॉ. आशिष वरघणे, अमेरिकेचे शास्त्रज्ञ डॉ. मंजूनाथन, जैन इरिगेशनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ढाके, डॉ. के. बी. पाटील, डॉ. बि. के. यादव, जलतज्ज्ञ डॉ. सुधीर भोंगळे, बी. डी. जडे, डॉ. डी. जी. पाटील, डॉ. विकास बोरोले, संजय सोन्नजे, तमस पटेल, गिरीष कुलकर्णी, अविनाश इंगळे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते बळीराम पूजन करण्यात आले. त्यानंतर कृषी महोत्सव पाहण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना गांधी टोपी, बागदार रूमाल तर महिला शेतकऱ्यांना दुप्पटा वाटप करण्यात आले.









