अभियांत्रिकी महाविद्यालयातून चोरट्यांनी मोबाईल लांबविले
धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) –धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील एसएसबीटी संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात पेपर देण्यासाठी आलेल्या तीन विद्यार्थ्यांचे मोबाईल लांबविल्याचा प्रकार शुक्रवारी १ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते १२ वाजेच्या दरम्यान घडला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात शनीवारी २ सप्टेंबर रोजी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील सावखेडा येथील प्रज्वल चंपालाल पाटील (वय-१९) हा तरूण शुक्रवारी १ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील एसएसबीटी संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात परिक्षा असल्याने मित्रांसह ते पेपर देण्यासाठी गेले. सकाळी १० वाजता पेपर असल्याने परिक्षेच्या आधी प्रज्वल पाटील यांनी त्यांच्या बॅगमध्ये त्याचे व मित्रांचे एकुण ३ मोबाईल बँगेत ठेवून परिक्षाहॉलमध्ये गेले. दरम्यान दुपारी १२ वाता पेपर सुटल्यानंतर बॅग तपासली असता अज्ञात चोरट्यांनी तीन मोबाईल चोरून नेल्याचे समोर आले.
ही घटना घडल्यानंतर तरूणाने सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर शनिवारी २ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता धरणगाव पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात धरणगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गजानन महाजन करीत आहे.