अभिषेक पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती
जळगाव (प्रतिनिधी) – महिलेसोबत अश्लील फोटो, व्हिडीओ बनवून अभिषेक पाटील यांना फसवायचे असा कट अभिषेक पाटील यांच्या सतर्कतेनेच उधळला गेला असल्याचे त्यांनी सोमवारी १९ रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांचे राजकीय जीवन उध्वस्त करण्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसांनी संबंधित महिला आणि अभिषेक पाटील यांचा जबाब घेतलेला आहे.
पत्रकार परिषदेत अभिषेक पाटील म्हणाले की, १५ ऑक्टोबर रोजी मुंबईवरून जळगावला परतत असतांना एका महिलेचा फोन आला. त्यांनी खाजगी काम आहे. व भेटायचे आहे असे सांगितले. अभिषेक पाटील यांनी दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात भेटायला या, असे सांगितले. दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय बंद असल्याने आभिषेक पाटील यांनी त्या महिलेला रिगरोडवरील कार्यालयात भेट घेण्यासाठी बोलाविले. यावेळी त्या महिलेने सांगितले की, मी मोठ्या राजकीय लोकांना मुली पुरविण्याचे काम करते. मला एका व्यक्तीने आगाऊ रक्कम देत आभिषेक पाटील यांचे अश्लील फोटो व व्हिडीओ काढून हवे आहे. व त्याच्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा करण्यासाठी पाठविल्याचे त्या महिलेने सांगत, तुमचे राजकीय कार्य चांगले असल्याने मला तुमचे आयुष्य खराब करावयाचे नाही. असेही त्या महिलेने अभिषेक पाटील यांना सांगितले.
हा सर्व घटनाक्रम पत्रकार परिषदेत मांडल्यावर अभिषेक पाटील म्हणाले की, एका भाजपा नगरसेवकाने अभिषेक चांगला माणूस आहे. त्याच्याबाबत असे करू नको असेही तिला सांगितले, त्यामुळे हा मोठा राजकीय कट माझ्याविरुद्ध रचला गेले असल्याचे दिसत असून याबाबत पोलीस तपासात भविष्यात सर्व सत्य समोर येईल असेही आभिषेक पाटील म्हणाले. दरम्यान रामानंदनगर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी संबंधित महिलेचा व माझा जवाब लिहून घेतले असल्याचे देखील अभिषेक पाटील म्हणाले.पत्रकार परिषदेला अँड. कुणाल पवार, स्वप्नील नेमाडे उपस्थित होते.