“देवगिरी” बंगल्यावर घेतली भेट
जळगाव (प्रतिनिधी) – येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अभिषेक पाटील, ऍड. कुणाल पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची बुधवारी दि. ५ जुलै रोजी भेट घेतली. प्रसंगी जळगाव जिल्ह्यातील सद्यस्थिती याबाबत अजित पवार यांनी माहिती जाणून घेतली.
राज्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्यात दुही निर्माण झाली आहे. त्यात अजित पवार यांनी स्वतःचा वेगळा गट काढून आमचीच राष्ट्रवादी पक्ष खरा असे सांगितले आहे. तर जळगाव जिल्ह्यातून आता प्रदेश सरचिटणीस अभिषेक पाटील व ऍड. कुणाल पवार यांनी बुधवारी अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर जाऊन प्रत्यक्ष भेट घेतली.
प्रसंगी अजित पवार यांनी जळगाव जिल्ह्यातील सद्यस्थितीबाबत अभिषेक पाटील यांच्याकडून माहिती घेतली. आगामी काळात राष्ट्रवादी पक्षाला अधिक बळकटी मिळवून देऊ. त्याकरिता जळगाव दौरा करेल असे अजित पवार यांनी अभिषेक पाटील यांना सांगितले. यावेळी जळगाव जिल्ह्यातील फिरोज शेख, पंकज वाघ, अक्षय पवार, पंकज बोरोले उपस्थित होते.