जळगाव;- येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सौ.प.न.लुंकड कन्याशाळेतील विद्यार्थीनींनी मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून शाळेचा एकूण निकाल ९९.२८ % इतका लागला असून शाळेतून शेकडा ९० टक््केच्यावर गुण प्राप्त करणाऱ्या एकूण ३४ विद्यार्थित आहेत तसेच शाळेतील एकूण पाच विद्यार्थिनींनी संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण मिळविले आहेत. शाळेतून प्रथम पाच विद्यार्थीनींची नावे पुढीलप्रमाणे. . . पहिली दुसरी तिसरी कु. कुलकणी मृणाल विनोद(९७.४०% ) , कु. पाटील गौरी गुलाब (९७.००%), कु. चौधरी नंदिनी दिपक (९६.६०%) , कु. पाटील राजनंदिनी प्रशांत( ९६.६०%) कु अंबेरे गायत्री (९६.२०%) ( , कु. बोरसे भाग्यश्री जितेंद्र ९६.२०%) , कु. खामकर मानसी हरीश (९६.००%)
शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष अँड्.सुशील अत्रे, सचिव अभिजीत देशपांडे, विश्वस्त . प्रेमचंद ओसवाल, सदस्य प्रा. शरच्चंद्र छापेकर, सदस्य .सुरेंद्र लुंकड, सदस्य .कंवरलाल संघवी, विश्वस्त व समन्वयक सौ.पद्मजा अत्रे, सदस्य अँड्.सौ.भारती इसई, सदस्य सौ.प्रतिभा देशकर, समन्वयक सौ.रेवती शेंदुणीकर, मुख्याध्यापिका सौ.साधना भालेराव, पर्यवेक्षिका सौ.स्वाती नेवे तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या सर्व विद्यार्थिनींचे कौतुक केले आहे.