मुंबई(वृत्तसंस्था ) : देशासह अनेक राज्यातील शहरांमध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. या लॉकडाऊनचा खूप मोठा परिणाम उद्योग, व्यवसाय, शिक्षण तसेच नोकरी आणि रोजगाराच्या क्षेत्रावर पण दिसून आला. याच पार्श्ववभूमीवर ठाकरे सरकारनं राज्यातील पोलीस भरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या तरुणासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. डिसेंबर २०२० पर्यंत राज्य पोलीस दलांमध्ये विविध पदांवर १२ हजार ५३८ कर्मचाऱ्यांची भर्ती केली जाणार आहे. अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीटरवर दिली आहे.

गृहमंत्र्यांनी या संदर्भात शुक्रवारी गृह विभागासाठीचे अतिरिक्त मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्यासह घेतलेल्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत या वर्षअखेरपर्यंत पोलिस भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.







