कोरोना व्यतीरिक्त उपचारांसाठी रूग्णालयात दाखल होणार्यांचीही संख्या वाढली
जळगाव – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी रूग्ण तपासणीवर निर्बंध आले असले तरी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात मात्र बाह्य रूग्ण तपासणीमध्ये कमालीची वाढ झाली आहे. रोज किमान ३५० रूग्णांची तपासणी विविध विभागांमार्फत केली जात आहे. सोशल डिस्टंन्सींग पाळुन रूग्णांना सेवा दिली जात आहे.
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय हे कोरोना रूग्णालय म्हणून घोषित झाले आहे. त्यामुळे कोरोना व्यतीरिक्त इतर आजारांच्या उपचारासाठी जिल्ह्यात सर्व सुविधांनी युक्त असलेले डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालय जिल्हा प्रशासनाने अधिग्रहीत करून त्याठिकाणी गोर गरीब रूग्णांना उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात एमआरआय, सीटी स्कॅन, एक्स-रे, सोनोग्राफी, नेत्र विभाग, शस्त्रक्रिया विभाग, मेंदू व मणका विभाग, मेडीसीन विभाग, रक्त तपासणी प्रयोगशाळा, अस्थिरोग विभाग, हृदयालय, फिजीओथेरेपी, स्त्रीरोग विभाग, एनआयसीयु, पीआयसीयु, अतिदक्षता विभाग, रक्तपेढी, या सारखे विभाग एकाच छताखाली उपलब्ध असल्याने गोरगरीब रूग्णांची फिराफिर होत नाही. तसेच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना, आयुषमान भारत योजन, इएसआयसी अशा शासकीय योजनांच्या माध्यमातुन गोरगरीब रूग्णांना मोफत उपचार उपलब्ध करून दिले जात आहे.
तज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी रूग्ण तपासणीबाबत उदासिनता दिसून येत आहे. मात्र डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात कोरोना व्यतिरीक्त इतर सर्व आजारांवर उपचार करण्यासाठी जोखीम पत्करून तज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत करण्यात आली आहे. तसेच तज्ञ डॉक्टरांसमवेत प्रशिक्षीत परिचारक, परिचारीका देखिल स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रूग्णांना सेवा देत आहे.
थॅलेसिमीयाग्रस्त बालकांना मोफत रक्त
थॅलेसिमीयाग्रस्त बालकांना डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातर्फे मोफत रक्त दिले जात आहे. रोज किमान २० ते २५ बालकांना मोफत रक्त उपलब्ध करून दिले जाते.
अशी आहे बाह्य रूग्ण तपासणी संख्या
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात बाह्य रूग्णांची संख्या वाढली असुन आवश्यक त्या रूग्णांना उपचारासाठी रूग्णालयात भरती देखिल करून घेतले जात आहे. विविध विभागांमध्ये बाह्य रूग्णांची संख्या अशी आहे.
बाह्य रूग्ण
स्त्रीरोग विभाग – ८८
मेडीसीन विभाग – ६५
अस्थिरोग विभाग ३०
नेत्र विभाग ५५
शस्त्रक्रिया विभाग ४४
एनआयसीयु ३७
पीआयसीयु २५
कॅन्सर विभाग १५
मेंदू व मणका विभाग २६
हृदयालय विभाग २२