डांभुर्णी ता यावल ः सध्या कोरोणा या रोगाच्या पार्श्वभूमीवर शासन विविध प्रकारे रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करीत असतांना या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी संचारबंदीची पून्हा मुदत वाढवली आहे.तसेच देशी विदेशीसह सर्व मद्य व आम्ल पदार्थांवर बंदी असल्यामुळे तळीरामांना मात्र गावठी पन्नी या परीसरात सहज ऊपलब्ध होत आहे.त्याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने यावल तालुक्यातील किनगाव डांभुर्णी परीसरात गावठी पण्यांचा महापुर आलेला आहे.यावल पोलीस निरीक्षक अरूण धनवडे यांनी गेल्या दोन महीन्यांपासुन नदी काठी सुरु असलेल्या अवैध धंद्याचा बंदोबस्त केल्याचा वाजागाजा केला खरा परंतु किनगाव सह डांभुर्णी परीसरात सर्रासपणे विकल्या जाणार्या या गावठी पोटलीच काय?या विक्रेत्यांवर अशिर्वाद कुणाचे?सध्याच्या कोरोणा व्हायरसच्या परीस्थीतीत पोलीस डिपारमेंटसह पोलीस पाटीलही सक्रिय आसल्याचा अहवाल धनवडे साहेब सोशल मिडीयावर देत आहेत मग् या परीसरातील सुरु असलेल्या गावठी पन्नीचा अहवाल पोलीस पाटलांनी दिला नसावा का? की पोलीस पाटलांच्या आशिर्वादानेच ही गावठी पन्नी विकली जात आहे? असे सुज्ञ नागरीकांमधून बोलले जात असुन जनतेच्या मनात संभ्रम निर्माण होत आहे. दहा रुपयाला विकल्या जाणिर्या पोटलीची चक्क तीस रुपयात विकली जात असुन तळीरामांचीही आर्थीक लुट होत आहे. अवैध विकली जाणार्या पोटली बाबत पोलीस पाटलांसह यावल पोलीस विभागाचे अक्षम्य होत आसलेल्या दुर्लक्षाचा नागरीकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.तरी वरीष्ठ अधीकार्यांनी या विषयाकडे गांभिर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे आम जनतेतुन बोलले जात आहे.पोटलीच्या मागे पळणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असुन कदाचीत या पोटलीवाल्यांकडूनच कोरोणाचा प्रादुर्भाव होऊ शकतो व त्याच्या फैलाव झाल्यास यास जबाबदार कोण ?असा प्रश्नही जनतेला भेडसावत आहे.या बाबत पोलीस प्रशासन लक्ष देईल का?वरीष्ठांकडून या बाबत चौकशी होईल का?याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.