जळगाव;- येथील तहसीलदार वैशाली हिंगे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे आदेश रात्री उशिरा काढण्यात आले आहेत. दरम्यान जळगाव प्रभारी तहसीलदारपदी संजय गांधी योजनेच्या तहसीलदार श्वेता संचेती यांची नियुक्ती करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी काढले आहे. आज सकाळीच श्वेता संचेती यांनी पदभार स्वीकारून नायब तहसीलदार, इतर कर्मचाऱ्यांशी कामकाजाविषयी चर्चा केली.