जळगाव ;- यावलचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांची बदली एमआयडीसी पोलीस स्टेशनाला होत असल्याच्या चर्चेने २५ रोजी सायंकाळी शंभरावर लोकांचा जमाव यावेळी जमला होता . यावेळी संचारबंदीचे नियम पायदळी तुडवून एवढी मोठी गर्दी जमा होण्याचे कारण काय असा प्रश्न सामान्य यावल तालुकावासीयांना पडला असून निरीक्षकांच्या समर्थनार्थ हा जमाव जमल्याचे उघड झाल्याने आणि स्वतःच पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला कामगिरी पाहून प्रमोशन केल्याचे उपस्थितांना सांगितले . तसेच तीन महिन्याच्या कारकिर्दीत जसा तालुक्यात आदरयुक्त भीती निर्माण केले तशीच आपण ठेवावी असे उपस्थितांना आवाहन केले .
बदलीबाबत आदेश नसतांना पोलीस निरीक्षकांनी आपल्या भाषणात एमआयडीसी पोलीस स्टेशनला बदली करण्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी त्यांची बदली खरेच एमआयडीसी पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे का याचा खुलासा जिल्हा पोलिसांकडून होणे गरजेचे आहे .
गर्दी जमवून कायद्याचे उल्लंघन
२५ रोजी सायंकाळी पोलीस स्टेशन समोर जमाव जमला होता . मात्र हा जमाव जमविण्यामागे गौडबंगाल काय असा सामान्यांना प्रश्न उपस्थित होत असून संचारबंदी असताना गर्दी कशी काय जमली आणि जमावबंदी असताना या जमावर गुन्हे का दाखल झाले नाहीत असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.