दिल्ली ( वृत्तसंस्था )भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मधल्या फळीचा आधारस्थान असलेल्या युवीनं टीम इंडियाला अनेक अशक्यप्राय विजय मिळवून दिले. 2007 चा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप आणि 2011च्या वन डे वर्ल्ड कप विजयात युवीचा सिंहाचा वाटा होता. 2007च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कपमध्ये त्यानं इंग्लंडविरुद्ध केलेली फटकेबाजी आजही सर्वांच्या…