40 मजूर जखमी ; पुरमेपाडा जवळची घटना
धुळे :- महामार्गावर ट्रक व डंपर यांच्यात विचित्र धडकेत परप्रांतीय मजूर ठार,वीस जण जखमीझाल्याची घटना घडली .
याबाबत मिळालेली माहिती अशी की, देशात लॉक डाऊन परिस्थिती सुरु असताना मजूरांचे हाल होत आहेत.खायला मिळत नाही.हाताला काम मिळत नाही.अशा परिस्थिती मजूरांना घराची वाट धरण्याची वेळ आली आहे.शहरातील हद्दीतून पायी चालत महामार्गावर येऊन मिळेल त्या वाहनाने म्हणजेच ट्रक, टेम्पो, रिक्षा, टॅकर,अशा वाहनात बसून आपल्या गावी जाण्यासाठी मजूर आपला जीव धोक्यात घालून शकडो मजूर महामार्गाहुन वाहतूक करताना चे चित्र दिसत आहे.अशात काल बुधवारी मध्यरात्री दिड वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 मुंबई-आग्रा मार्गावर पुरमेपाडा गावाजवळ रिलायन्स पेट्रोल पंप समोर परप्रांतिय मजूरांवर कालाने घाला केला.यात महामार्गावर डंपर क्रं.mh 48 ag. 5427 व मजूरांना उत्तरप्रदेश नेणारा ट्रक क्रं.od 17 p 3933 या दोघांत विचित्र अपघात झाला.यात परप्रांतिय मजूरांना नेणाऱ्या ट्रक मधील एका मजूराचा जागीच मृत्यू झाला आहे.व यात बसलेले महिला,षुरुष, लहान मुले असे एकूण 35 ते 40 जण जखमी झाले आहे.त्यांना टोलनाक्यावरील कर्मचारी यांनी अपघात माहिती कळताच घटना स्थळ गाठून ट्रक मध्ये अडकलेल्या जखमी मजूरांना बाहेर काढून रुग्णवाहिकेतून चक्कर बर्डी येथील हिरे मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.दोन्ही वाहने क्रेनच्या मदतीने महामार्गावरून हटवण्यात आल्यावर वाहतूक पुर्ववत करण्यात आली.
अपघात बाबत उशीरापर्यंत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.