पाचोरा ;- येथील श्री गो से हायस्कूल शिक्षकांना घरीच राहून ऑनलाईन अभ्यास करण्याच्या सूचना देण्यात आल्याने आता
विद्यार्थ्यांचा वर्गनिहाय व्हाट्सअप ग्रुप तयार करून ऑनलाइन अभ्यास सुरू केला आहे. या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष दिलीप वाघ,चेयरमन संजय वाघ, व्हाइस चेयरमन व्ही टी जोशी , सचिव महेश देशमुख, शालेय समिती चेयरमन खलील देशमुख, तांत्रिक विभागाचे चेयरमन वासुदेव महाजन , मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक,यांनी अभिनंदन केले आहे.
गो से स्कूलतर्फे दीक्षा अँपद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण
येथील श्री गो से स्कूलचे मुख्याध्यापक एच डी पाटील सर हे आपल्या शिक्षकांच्या माध्यमातून लॉक डाऊनच्या काळात आता देखील संपर्कात आहेत शिवाय घरात बसून या ॲपद्वारे फक्त दहावीचेच नव्हे तर वर्ग 5 ते 10 पर्यंत चे सर्व विद्यार्थी घरात बसून अभ्यास करू शकत आहे आणि त्याचे अपडेट देखील संबंधित वर्गाचे वर्ग शिक्षक घेत असून प्रत्येक वर्गात चे कामकाज कसे चालू आहे हे देखील स्वतः मुख्याध्यापक एस. डी. पाटील स्वतंत्र पाहू शकत आहे व संपूर्ण काम & अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना विनामूल्य देण्यात येत आहे.