मुंबई –राज्यात कोरोनाचा कहर चांगलाच वाढला असून आता राज्यातील ४० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोना बळींची संख्या १९३ वर जाऊन पोहचली आहे . दुसरीकडे राज्यातील कोरोनाबधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. आज अजून काही रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आढळून आल्याने महाराष्ट्रातील कोरोनाबधितांची संख्या 193 वर पोहोचली आहे. पुणे 5, मुंबई 4 तर जळगाव, नागपूर आणि सांगलीमध्ये कोरोनाचे प्रत्येकी एक नवे रुग्ण आढळले आहेत.