अमळनेर ;- कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर राखत आज २७ फेब्रुवारी २०१९ रोजी जिल्हा परिषद विश्रामगृह धुळे रोड येथून माननीय लोकनियुक्त नगराध्यक्ष पुष्पलता साहेबराव पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली. या वेळेस माजी आमदार कृषीभूषण साहेबराव धोंडू पाटील ,माननीय उपविभागीय अधिकारी श्रीमती सीमा अहिरे, माजी नगराध्यक्ष श्री विनोद भैय्या पाटील, पोलिस निरीक्षक श्री . भागवत मुख्याधिकारी विद्या गायकवाड, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड ,प्रशासन अधिकारी संजय चौधरी ,लेखाधिकारी चेतन गडकर ,प्रशांत ठाकूर विद्युत अभियंता, निलेश साळुंके सामाजिक कार्यकर्ता, डॉक्टर शरद पाटील ठाणे अंमलदार, सामाजिक कार्यकर्ते भरत पवार व मनोज शिंगणे, पत्रकार संजय पाटील, किरण पाटील आरोग्य निरीक्षक संतोष बिऱ्हाडे ,अरविंद कदम, महेश जोशी सभा लिपिक, उपस्थित होते सायकल रॅली जिल्हा परिषद रेस्ट हाऊस पासून सुरू होऊन धुळे रोड जवळील समर्थनगर परिसरात येऊन जिजाऊ उद्यान येथे ७० वृक्षांची लागवड करण्यात आली त्याच प्रमाणे विवेकानंद विवेकानंद नगर येथील स्वामी विवेकानंद उद्यान येथे व संत सखाराम महाराज नगर उद्यानात प्रत्येकी ४० व २० वृक्षांची लागवड करण्यात आली एकूण १३० वृक्ष लागवड करण्यात आली.








