सीबीएसई बोर्डाच्या दहावी-बारावीच्या परिक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. सुप्रीम कोर्टात यासंदर्भात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान सीबीएसई बोर्डानं आपली बाजू कोर्टात मांडल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

सीबीएसई बोर्डानं दहावी-बारावीच्या परीक्षा 1 ते 15 जुलैदरम्यान घेण्याचे निश्चित केलं होतं. मात्र, परिस्थितीत सुधारणा होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.
कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे बारावीच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या परीक्षा कधी होणार होणार की रद्द केल्या जाणार याबाबत अनेक दिवसांपासून विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम होता. सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर या परीक्षा रद्द करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. देशभरात सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ऐन परीक्षेच्या काळात कोरोनाचा देशात शिरकाव झाल्यानं सीबीएसईच्या परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. त्यानंतर सुधारित वेळापत्रकानुसार सीबीएसई बोर्डानं दहावी-बारावीच्या परीक्षा 1 ते 15 जुलैदरम्यान घेण्याचे निश्चित केलं होतं. मात्र, देशातील कोरोना परिस्थितीत सुधारणा होत नसल्यानं या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.







