जळगाव पोलिसांनी भांडण झालेल्या नवरा बायकोमध्ये घडवून आणला समेट
जळगाव ;- शहरातील रामेशवर कॉलनी भागात राहणाऱ्या पती पत्नीचे भांडण झाल्याने पती आपल्या सहा महिन्याच्या कियारा नावाच्या तान्हुली बाळाला घेऊन आपल्या मूळ गावी निघून गेल्याने अवघ्या सहा महिन्याचे बाळ आईविना कसे राहील या विवंचनेत असणाऱ्या सायली आनंद राठोड हल्ली मुक्काम रामेश्वर कॉलनी एमआयडीसी पोलिसांकडे धाव घेऊन बाळ ताब्यात देण्याची मागणी केली .तिचा पती हा फर्दापूर पोस्ट हद्दीत सावदबारा औट पोस्ट हद्दीत असणाऱ्या चारू तांडा नामक गावी असल्याने तसेच न्यायालयीन प्रक्रियाला लागणारा विलंब आणि औरंगाबाद ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीचा प्रश्न उद्भवल्याने एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पीएसआय संदीप पाटील यांनी हि बाब आपले वरिष्ठ अधिकारी अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके ,पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांना कळविली होती . त्यांच्या सूचना आणि मार्गदर्शनानुसार पीएसआय संदीप पाटील यांनी जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. इंगळे यांना परिस्थिती कथन केली . मात्र जामनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा चारू तांडा गाव येत नसल्याने आणि लोकडाऊन असल्यामुळे फर्दापूर पोलीस स्टेशनांतर्गत येणाऱ्या सावदबारा औट पोस्टचे एएसआय मोरे यांच्याशी संपर्क साधला असता आज शनिवार १६ रोजी सकाळी कुसुंबा येथील डॉ. विकास पाटील आणि पोलिसांच्या मदतीने दोघा पतिपत्नींमध्ये समेट घडवून आणला . आई सायलीने आपल्या तान्हुलीला छातीशी लावून कुरवाळले असता तेथील उपस्थितांचेही डोळे पाणावले . पीएसआय संदीप पाटील यांनीही भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून समजूत काढली . सामोपचाराने दोघांमध्ये समेट घडवून आणल्याचे कौतुक होत आहे .