जळगाव ;– जिल्ह्यातील २० कोरोना संशयितांचे अहवाल आज सकाळी प्राप्त झाले असून ते सर्वच्या सर्व निगेटीव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आलेली आहे.
जळगाव जिल्हा कोविड रूग्णालयातील कोरोना अहवालाबद्दल आज सकाळी जिल्हा माहिती कार्यालयाने एका प्रेस नोटच्या माध्यमातून ताजी माहिती जाहीर केली आहे. यानुसार कोविड रूग्णालयातर्फे २० स्वॅब सँपल्स हे चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. हे सर्वच्या सर्व म्हणजे २० रूग्ण कोरोना निगेटीव्ह असल्याचे आढळून आले असल्याचे म्हटले आहे. या अहवालात पारोळा येथील 14 व्यक्ती, पाचोरा येथील 4 व्यक्ती, जामनेर व जळगाव येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या ५२ असून यातील १३ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर, अनेकांच्या चाचणीचा अहवाल अद्याप बाकी आहे.