जळगाव ;- उपविभागीय अधिकारी डॉ. निलाभ रोहन यांनी आपल्या पथकासह मंगळवारी रात्री पिंप्राळा परिसरातील मयूर कॉलनी येथे जुगार अड्ड्यावर धाड टाकून १२ जण ताब्यात तर पावणे तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला होता . मात्र ज्या ठिकाणी हा जुगार सुरु होता ते घर भाजपचे नगरसेवक कुलभूषण पाटील यांचे असल्याचे पोलिसांचे म्हणणे होते . मात्र केसरीराजशी बोलतांना कुलभूषण पाटील यांनी त्यांच्यावर झालेले आरोप फेटाळून लावले असून जुगार आणि जुगार चाललेले घर यांच्याशी आपला काहीही संबंध नसल्याचा खुलासा त्यांनी बोलताना व्यक्त केला .