जळगाव (प्रतिनिधी) कोरोना कक्षात अॅडमिट असलेल्या येथील एका व्यक्तीचा दमा आणि मधूमेहाने मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली असून त्याचा कोरोना विषाणूने मृत्यू झाला नसल्याचा निर्वाळा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की एका रुग्णाचा आज सकाळी मृत्यू झाला आहे. या रुग्णाचा कोरोना चाचणीचा अहवाल अद्याप आलेला नसल्यामुळे मृत्यूचे कारण अस्प्ष्ट असून मृत व्यक्ती हा चोपडा येथी असल्याचे कळते .
सोमवारी सायंकाळपर्यंत कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नवीन तीन रूग्णांना दाखल करण्यात आले होते. आत्तापर्यंत ७१ जणांना उपचारार्थ दाखल केले असून त्यातील ४१ रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तर २७ जणांचे रिपोर्ट प्रलंबित आहे. कोरोना विषाणूचे पडसाद आता जिल्ह्यात जाणवू लागले आहे. दोन दिवसांपुर्वीच एक रूग्णाला कारोनाची लागण झाल्याचे समोर आल्यामुळे खळबळ उडाली होती. दोन दिवसांपुर्वी रूग्ण आढळून आल्यामुळे जळगावातील मेहरूण परीसर सील करण्यात आला आहे. दरम्यान, संबंधीत रूग्ण हा मेहरूणमधील नसून तो चोपडा येथील असल्याची माहिती मिळाली आहे.