नवी दिल्ली;- कोरोना व्हायरसची दहशत जगभरात पसरली आहे. अशात इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परतायचं होतं. मायदेशी परतता येईल की नाही ही चिंता त्यांना लागून राहिली होती. मात्र ही चिंता आता संपली आहे. कारण कोरोनाच्या दहशतीत जगणाऱ्या 236 भारतीयांना मायेदशी आणण्यात आलं आहे.
परराष्ट्र मंत्री एस. जय शंकर यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. तसंच या 236 जणांमध्ये 131 विद्यार्थी आहेत, असंही जयशंकर यांनी म्हटलं आहे.
44 प्रवाशांना इराणहून भारतात आणलं गेलं. त्यानंतर आतापर्यंत एकूण 236 भारतीयांना इराणहून भारतात आणण्यात आलं आहे. यासाठी जयशंकर यांनी इराण सरकार आणि भारतीय दुतावासाचे आभारही मानले आहेत.
इराणमध्ये कोरोना व्हायरसमुळे 100 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे तिथे गेलेले भारतीय हे मायदेशी परतण्याच्या चिंतेत होते. मात्र अखेर त्यांची ही चिंता मिटली आहे.