जळगाव ;– जुन्या भांडणाचा राग मनात ठेऊन १३ जून रोजी दोघांवर चॉपरने हल्ला करणाऱ्या चौघांच्या शनिपेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्यांना आज सकाळी अटक करण्यात आली आहे .
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , बालाजी पेठेत सतीश बद्री नारायण शर्मा (वय-५५) हे पत्नी मुले व सून या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. १३ जून रोजी रात्री आठ वाजता बालाजीपेठेतच राहणारे रोहित कांतीलाल तिवारी याच्यासह त्य़ांची ३ भावंडे शर्मा यांच्या घरी आले. वाद घालत रोहित याने घरातील शर्मा यांची मुलगी राधिका हिच्या चेहर्यांवर चॉपरने वार केले. यानंतर सतिष शर्मा यांच्याही मानेवर पोटावर वार करुन त्यांना गंभीर जखमी केले. यानंतर चारही जण पसार झाले होते. कुटुंबियांनी दोघांना खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
या प्रकरणी सतीश बद्री नारायण शर्मा यांच्या फिर्यादीवरून रोहित कांतिलाल तिवारी, राहुल कांतिलाल तिवारी, कैलास मदनलाल तिवारी, सत्यनारायण मदनलाल तिवारी या चौघांविरोधात शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यातील फरार चारही आरोपींनी शनी पेठ पोलीस ठाण्याचे पोहेकॉ दिनेशसिंग पाटील, रविन्द्र पवार, परिस जाधव, अभिलाषा मनोरे, धनजय येवले यांनी आज सकाळी चौघांना अटक केली आहे.