जळगाव ( प्रतिनिधी) – सध्या राज्याच्या राजकीय परिघात पुन्हा एकदा माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे चर्चेत आहेत ते त्यांच्या नेहमीच्याच बिनतोड भूमिकेमुळे. भाजपने अचानक नवीन चेहर्यांना संधी देत ज्या जुन्या व प्रभावी नेत्यांना विधानपरिषदेची उमेदवारी नाकारली त्यात एकनाथराव खडसेही आहेत. मात्र ज्यांना उमेदवारी नाकारली त्यांच्यापैकी फक्त नाथाभाऊंचीच प्रतिक्रीया टोकाची व आक्रमक दिसल्याने सर्वांच्याच भूवया पुन्हा उंचावलेल्या आहेत. त्यांचे नाराजी व्यक्त करण्यातले सातत्य व भूमिकेतील ठामपणा पक्षांतर्गत विरोधकांना आव्हान देत धडकी भरवणारा आहे, हे मात्र नक्की .
पुण्यातील एमआयडीसीतील भूखंडाची कथित संशयास्पद खरेदी, फोनवरून दाऊदच्या बायकोशी कथित संभाषण, कथित स्वीय सहाय्यकाची ( गजानन पाटील) कथित लाचखोरी, जावयाची महागड्या कारची कथित खरेदी अशा आरोपांची राळ उडवल्या गेल्यावर नाथाभाऊंना महसूलमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतरच्या सगळ्या घडामोडी व विधानसभेची उमेदवारी नाथाभाऊंना नाकारून त्यांच्या मुलीला दिल्यानंतर त्यांच्या मुलीचा झालेला पराभव सगळ्यांना माहिती आहे. सगळ्याच राजकीय बाबी विरोधत जात असताना त्यांच्या सून लोकसभेच्या निवडणुकीत निवडून आल्या, हीच बाब त्यांच्याबाबतीत अलिकडच्या काळातील समाधानाची बाब म्हणावी लागेल. मात्र त्यांच्याबाबतीत पक्षाच्या पातळीवर त्यांचे अंतर्गत विरोधक जणू टपून बसल्यासारखेच त्यांचे खच्चीकरण करण्यासाठी संधी शोधत असल्याचे सगळ्यांना दिसते आहे. पक्षाच्या पातळीवर टोकाचा विरोध वाढत असला तरी पक्ष न सोडता किंवा पक्षाला अडचणीत न आणता वेळोवेळी आपली व्यथश मांडत दाराजी व्यक्त करण्यातले सातत्य त्यांनी आतापर्यंत सोडलेले नाही. त्यांची ही नेमस्त भूमिका त्यांच्या राजकीय संयमाचे विरोधकांनाही कौतूक वाटावे अशी ठरलेली आहे. विरोधकांना पुरून उरताना नाथाभाऊ आता विधानपरिषदेच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व देवेंद्र फडणवीस यांच्यावर तुटून पडलेले दिसत आहेत.
जळगाव जिल्ह्यात 1980 सालापासून भाजपचे पक्ष संघटन मजबूत करून या पक्षाचे वर्चस्व जिल्ह्यात अबाधित ठेवण्यातली सक्रीय भूमिका त्यांनी यावेडळीही ठामपणाने अधोरेखित केली आहे. त्याचवेळी त्यांनी आता भाजपमध्ये आता सामूहिक निर्णयांची बूज राखली जात नाही असे सांगत केंद्रीय नेतृत्वालाही विचारात टाकलेले आहे. मी काय प्रदेश पातळीवरील पार्लमेंटरी बोर्डाचा नामधारी सदस्य आहे का?, असा रोकडा सवाल करून त्यांनी चंद्रकांत पाटील व देवेंद्र फडणवीस यांची बोलतीच विधानपरिषद निवडणुकीच्या मुद्दयावर बंद करून टाकलेली आहे.
आता कोरोनाची त्रासाची परिस्थिती निवळळ्यावर आपण राज्यभरातील समर्थकांशी चर्चा कून आतापर्यंत झालेल्या गळचेपीचा निकाल लावून टाकू , अशी भूमिका त्यांनी आता घेतलेली असल्याने त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना आता थिल्लर चाळ्यांचे पुचाट डावपेच टाकून जमणार नाही असा राखठोक इशाराही त्यांनी अप्रत्यक्षपणे देऊन टाकलेला आहे. आजही भाजपच्या 105 पैकी किमान 17 आमदार त्यांनी आपले समर्थक असल्याचे अप्रत्यक्षपणे सुचवून पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वालाच जबरदस्त तडाखा देत मला छळणारे थकल्याव मी त्यांना सहज लोळवीन म्हणून सध्या शांत दिसोयं , मात्र तसा मी शांत राहणारा नाही, असेही सांगून टाकलेयं . चंद्रकांत पाटील त्यांना पक्षाचे मार्गदर्शक म्हणून काम करा, सक्रीय राजकाररणातून बाजूला व्हा , असे सुचवत असले तरी आपण तसा विचार करणारे नाही, ज्येष्ठत्वाच्या आधारावर मला असे सांगणारांनही निवृत्त व्हावे , हा त्यांनी दिलेला तडाखा आतापर्यंंत नडलेल्यांशी पुर्ण दोन हात करण्याची त्यांची तयारी असल्याचेच सुचवतोयं.