जळगाव ;- आजीच्या कट्टयावर गृहिणी असणाऱ्या सौ. निर्मला रघुनाथ मालकर या आजींनी आपल्या ओघवत्या शैलित मुलांना गोष्टी सांगितल्या. सुरवातीला गोष्टी संबंधीच्या गप्पा झाल्यावर ‘ एेकिचे बळ ‘ हि गोष्ट सांगितली. त्यात आपण सर्वांनी संघटीत राहिलो तर अनेक चांगल्या गोष्टी निर्माण करू शकतो. एकत्रित येतांना चांगल्या हेतूने एकत्रित येणे आवश्यक आहे हे मुलांना सोप्या शब्दात समजवुन दिले.
त्यानंतर मुलांच्या आग्रहाखातर आजींनी ‘ लाकुडतोड्याची व वाघोबा व आजीबाई यांच्याही गोष्टी सांगितल्या . मुलांनी ह्या गोष्टी आवडीने ऐकल्या.
ह्या उपक्रमासाठी मुख्याध्यापक श्री. हेमराज पाटील सर व समन्वयिका सौ. जयश्री वंडोळे दीदी यांचे मार्गदर्शन लाभले. ह्या उपक्रमासाठी सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.