औरंगाबाद ;- शहरातील कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. औरंगाबाद शहतील कोरोना रुग्णांची ही वाढ चिंताजनक आहे. आज पुन्हा 24 नवे रुग्ण वाढले आहेत. यामुळे आता शहरातील कोरोना बाधितांची संख्या ही 321 वर गेली आहे. यामुळे शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आज सकाळी सापडलेल्या रुग्णांमध्ये जय भीमनगर 21, अजबनगर 1, संजयनगर 1 , बुद्धनगर 1 येथील रुग्णांचा समावेश आहे. तसेच हॉटस्पॉटही वाढले आहेत. अजबनगरात कोरोनाने शिरकाव केला आहे. आता या 24 रुग्णांची भर पडल्याने औरंगाबादमधील कोरोना रुग्णांची संख्या 321 एवढी झाली आहे. तर शहरात आतापर्यंत कोरोनामुळे 10 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण 25 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज मिळाला आहे.